जगातील सर्वोत्तम अभिनेता नरेंद्र मोदी - जिग्नेश मेवानी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नवी दिल्ली - जिग्नेश मेवानी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित समाजासाठी बनावट समर्थन देत आहेत, असा आरोप केला आहे. 21 व्या शतकात जगातील सर्वोत्तम अभिनेता भारतातून असेल, असे फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्राडेमस यांनी म्हटले होते. हा अंदाज खरा ठरला असे म्हणत मेवानी यांनी हा सर्वोत्तम अभिनेता पंतप्रधान मोदी असल्याचे वक्तव्य केले आहे. 

हे वक्तव्य जिग्नेश मेवानी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन केले आहे. या ट्विटमध्ये मेवानी यांनी एका व्हिडीओचा देखील समावेश केला आहे. नरेंद्र मोदी हे या व्हिडीओमध्ये दलित समाजाविषयी आत्मीयतेने बोलत आहेत. 

राष्ट्रीय दलित अधिकारी मंचच्या संयोजकांनी देखील मोदींवर खोटे दलित प्रेम दर्शवत असल्याचा आरोप केला होता. दलित समाजासाठी आपली खोटी सहानुभूती दाखवत असल्याचेही म्हटले आहे.

उजवी विचारसरणीचे नेते संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित समाजाच्या समाधीचा अपमान करुन हिंसाचार भडकवला होता. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दलित समाजाने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र बंदची हाक देऊन निषेध व्यक्त केला.   

Web Title: Marathi News Narendra Modi is a Worlds best actor said Jignesh Mevani