शाळेतील अन्नातून प्ले-ग्रुपच्या 120 विद्यार्थ्यांना विषबाधा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

थोन्नाकेल जिल्ह्यातील एका विद्यालयातील प्ले-ग्रुपमध्ये हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शाळेत दिले जाणाऱ्या अन्नातून विषबाधा झाली. 

तिरूअनंतपुरम : शाळेत दिले जाणाऱ्या अन्नातून 120 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांनी अन्न खाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी थोन्नाकेल जिल्ह्यातील प्ले-ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहेत.

थोन्नाकेल जिल्ह्यातील एका विद्यालयातील प्ले-ग्रुपमध्ये हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शाळेत दिले जाणाऱ्या अन्नातून विषबाधा झाली. यातील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज दिला जाणार आहे, याबाबतची माहिती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने काढलेल्या पत्रकात देण्यात आली. 

पालकांना या घटनेची माहिती मिळताच या सर्व बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील अन्नाचे नमुने घेण्यात आले असून, ते पुढील परिक्षणासाठी पाठवले जाणार आहेत.

Web Title: Marathi news National 120 children hospitalized in Kerala after eating school meal

टॅग्स