29 हस्तकला वस्तूंवरील जीएसटी माफ : अरूण जेटली

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

''या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या कराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.''

- अरूण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ''29 हस्तकला वस्तूंवरील जीएसटी कर माफ करण्यात आला असून, 49 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे'', अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरुवार) दिली. 

जीएसटी परिषदेची बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जेटली बोलत होते. ते म्हणाले, ''49 वस्तूंवरील जीएसटी करात कपात करण्यात आली. तसेच 29 हस्तकला वस्तूंवरील जीएसटी कर माफ करण्यात आला आहे. शेतींच्या अवजारांवरील जीएसटी 18 टक्यांहून 12 टक्के करण्यात आला आहे. हा सर्व नवा जीएसटी दर 25 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे,'' अशी माहिती जेटलींनी दिली. 

जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रिया सुलभ व्हावी, यांसह विविध मुद्दासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मात्र, जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रियेबाबत या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच सर्वात महत्वाचा विषय असलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या करही तसाच आहे. यावर निर्णय घेण्यात आला नाही.  

दरम्यान, या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या कराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही जेटलींनी सांगितले. 

Web Title: Marathi News National 29 hand made things GST has been cancelled says Finance Minister Arun Jaitley