देशातील 36 टक्के मुलांना माहित नाही देशाची राजधानी

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

भारताचा नकाशा दाखवण्यात आला. मात्र, यातील 14 टक्के मुलांना तो ओळखताही आला नाही. तसेच काही मुलांना देशाची राजधानी कोणती, असे विचारण्यात आले. यातील 36 टक्के मुलांना राजधानी कोणती हे सांगताही आले नाही.

नवी दिल्ली : देशातील 14 ते 16 वयोगटातील मुले त्यांची बोलीभाषा अस्खलिखितपणे बोलू शकत नाहीत. इतकेच नाहीतर यातील काही मुलांना देशाची राजधानीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

'अॅन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट'ने (शैक्षणिक अहवालाबाबतची वार्षिक स्थिती) सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. देशभरात 24 राज्यातील 28 जिल्ह्यांमधून काही मुलांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सहभागी मुलांना भारताचा नकाशा दाखवण्यात आला. मात्र, यातील 14 टक्के मुलांना तो ओळखताही आला नाही. तसेच काही मुलांना देशाची राजधानी कोणती, असे विचारण्यात आले. यातील 36 टक्के मुलांना राजधानी कोणती हे सांगताही आले नाही. विशेष म्हणजे यातील 21 टक्के मुलांना आपण कोणत्या राज्यात राहतो, याची माहिती नसल्याचे समोर आले.

सर्वेक्षणाच्या संशोधनातून हे सिद्ध झाले, की सुमारे 40 टक्के तरुणांना व्यवसायासाठी आदर्श व्यक्ती नसल्याने ते व्यवसायात सामील होण्याची इच्छा बाळगत नाहीत. 

''ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. या परिस्थितीनुसार काय चालू आहे आणि यापुढे काय करावे लागेल. याबाबत विचार करावा लागणार आहे'', असे मुख्य अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम् यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news National ASER survey shows 36 of kids aged 14 16 dont know Indias capital 21 cant name their state