भोपाळ सामूहिक बलात्कारप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश

file photo
file photo

भोपाळ : भोपाळमध्ये 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास हबीबगंज पोलिसांनी उशीर केल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर लाड यांनी या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना स्षटीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

हबीबगंज रेल्वे स्थानकाजवळ 31 ऑक्टोबरच्या रात्री एका तरूणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्या नराधमांनी गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पीडित आणि तिचे कुटुंबीय याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी एमपी नगर पोलिस स्थानकामध्ये 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता गेले होते. मात्र, तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई केली जात होती. अखेर तब्बल 12 तासांनी हबीबजंग ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, यादरम्यान पीडित आणि तिचे कु़टुंबीयांना तक्रार दाखल करण्यासाठी एका पोलिस स्थानकाहून दुसऱ्या पोलिस स्थानकामध्ये जावे लागले होते.

पोलिस उपमहानिरीक्षक लाड यांनी याप्रकरणाचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक अरूणा मोहन राव यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 
 
दरम्यान, याप्रकरणाची तक्रार दाखल करण्यास उशीर केल्याने तीन पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस उपनिरीक्षकांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, शहर पोलिस अधीक्षक आणि ग्रामीण पोलिस उपअधीक्षक यांची बदलीही करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com