भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात 8 पाकिस्तानी रेंजर्स ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अद्यापही गोळीबार सुरुच आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या या प्रत्युत्तरात 8 पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून, पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अद्यापही गोळीबार सुरुच आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या या प्रत्युत्तरात 8 पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले असून, पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धवस्त करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या 35 चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय लष्करातील जवान आणि नागरिकांना लक्ष्य केले जात होते. शुक्रवारी रात्री पाकिस्तानकडून अरनिया, सुचेतगढ, आरएस पुरा, पर्गवाल, कानाचक आणि अखनूरच्या भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबारात जम्मूच्या कानाचक भागात एक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने सांबा, आरएसपुरा आणि हीरानगर सेक्टरवर पाकिस्तानविरोधात मोठी कारावई केली. या प्रत्युत्तरादरम्यान शकरगढ आणि सियालकोट येथील आठ पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्सना ठार करण्यात आले.  

दरम्यान, पाकिस्तानकडून काल (शुक्रवार) सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले होते.

Web Title: Marathi news National border firing bsf posts pakistani rangers jammu