गुजरातमध्ये भाजप 150 जागा जिंकेल : अमित शहा

amit shah
amit shah

गांधीनगर : उत्तर प्रदेश महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. या निकालामुळे गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल याचे चित्र मतमोजणीनंतर 18 डिसेंबरला स्पष्ट होणार असून, भाजप 150 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन करेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेत्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. महापालिकांच्या निकालांमधून आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल, हे 18 डिसेंबरला निकालानंतर कळेल, असे शहा म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून ''काँग्रेस येणार" अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, उत्तर प्रदेशच्या या निकालानंतर  आता येथील जनता ''काँग्रेस जात आहे" अशा घोषणा देत आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत महापौरपदाची एकही जागा मिळवता आली नाही. इतकेच काय तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातही त्यांना विजय मिळवता आला नाही. दुसरीकडे भाजपला 16 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाल्याने भाजपचा झेंडा उंचावला गेला आहे, असे शहा म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या या निकालामुळे गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल, याचे चित्र मतमोजणीनंतर 18 डिसेंबरला स्पष्ट होणार असून, भाजप 150 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com