भारतात लवकरच येणार 'फ्लाइंग ऑटो'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

'फ्लाइंग ऑटो'साठी आमच्या मंत्रालयकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे. 'फ्लाइंग ऑटो'साठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे''

- जयंत सिन्हा, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री

नवी दिल्ली : सध्या देशभरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावर उपाय म्हणून 'फ्लाइंग ऑटो'ची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. 

'सिटी डाटा फॉर इंडिया कॉन्क्लेव्ह 2018' मध्ये सिन्हा बोलत होते. सिन्हा म्हणाले, 'फ्लाइंग ऑटो'साठी आमच्या मंत्रालयकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे. 'फ्लाइंग ऑटो'साठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी नव्या नियमावलीची आखणीही केली जाणार आहे, असे ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, प्रवासाचा खर्च हा हवाई प्रवासाच्या खर्चासारखा वाटत आहे. किमीचे अंतर पार करण्यासाठी शहरी भागातील नागरिकांना प्रतिकिमी 4 रुपयांचा खर्च येतो. हा खर्च हवाई प्रवासासमान असल्याचे दिसत आहे. याबाबतची माहिती नुकत्याच गेलेल्या सर्वेक्षणानुसार समोर आली आहे. मात्र, त्यांनी ही योजना कधी अमलात आणली जाणार याबाबतची माहिती दिली नाही. 

Web Title: marathi news national Coming soon flying rickshaws in India say jayant sinha