फी न भरल्याने शाळेचा प्रवेशास नकार ; विद्यार्थिनीची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

येथील 14 वर्षीय विद्यार्थिनी एका खासगी शाळेत शिक्षण घेत होती. मात्र, तिने शाळेत फी भरली नसल्याने शाळा प्रशासनाने तिला शाळेत बसण्यास मनाई केली होती. शाळेत न घेतल्याच्या निराश्येतून विद्यार्थिनीने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हैदराबाद : देशातील अनेक बालकांना शिक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राष्ट्रीय पातळीवर अभियानही राबविले जात आहे. असे असताना हैदराबादेत फी न भरल्याने शाळेत प्रवेश न दिल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना हैदराबाद येथील मल्काजगिरी येथे गुरुवारी रात्री घडली.   

A Class 9 student hanged herself

येथील 14 वर्षीय विद्यार्थिनी एका खासगी शाळेत शिक्षण घेत होती. मात्र, तिने शाळेत फी भरली नसल्याने शाळा प्रशासनाने तिला शाळेत बसण्यास मनाई केली होती. शाळेत न घेतल्याच्या निराश्येतून विद्यार्थिनीने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत विद्यार्थिनी नववीत शिक्षण घेत होती. तिने राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. 

दरम्यान, फी न भरल्याने तिला शाळा प्रशासनाने शाळेत बसण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती खूप निराश होती. या नैराश्येतूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. 

Web Title: Marathi News National Crime Girl Committed Suicide School Fees not Paid