लग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तरुणीची हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला''

- भूजंग राव, वरिष्ठ पोलिस अधिकारी 

हैदराबाद : एका 24 वर्षीय तरूणीला तिच्या सहकाऱ्याकडून लग्नासाठी वारंवार त्रास दिला जात असे. त्यानंतर तिने लग्नास नकार दिल्यानंतर तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबाद येथे घडला.

बोनू जानकी असे 24 वर्षीय तरूणीचे नाव आहे. आनंद अनंथप्पा आणि जानकी हे दोघे एकत्र एका दुकानात कामास होते. आनंदकडून जानकीला लग्नासाठी वेळोवेळी दबाव दिला जात असे. तसेच त्याच्याकडून जानकीला गेल्या सहा महिन्यांपासून त्रासही दिला जात असे. त्यानंतर पुन्हा एकदा तिला लग्नाबाबत विचारण्यासाठी आनंद जानकीच्या घरी गेला होता. तेव्हाही जानकीने तिला नकार दिला होता. त्यामुळे या दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये आनंदने जानकीला किचनमधील चाकूने भोसकले. त्यानंतर त्याने तिचा गळाही दाबला. यात तिचा मृत्यू झाला.  

''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला'', असे वरिष्ठ पोलिस अधिकारी भूजंग राव यांनी सांगितले.

''मंगळवारी रात्री आनंद हा जानकीच्या घरी गेला होता आणि तेव्हा त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आनंदने जानकीला किचनमधील चाकूने तीनदा भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याने तिला थोबाडीतही मारली. जेव्हा जानकीची रुममेट घरी परतली तेव्हा जानकी अस्वस्थपणे जमिनीवर पडल्याचे आढळून आली. त्यानंतर तिने जानकीला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला."

दरम्यान, पोलिसांनी आनंदला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Web Title: marathi news national crime She Refused To Marry Colleague In Hyderabad Killed With Kitchen Knife