भाजप नेत्याकडून ममता बॅनर्जींना नाक कापण्याची धमकी

surajpal ammu
surajpal ammu

नवी दिल्ली : ''काही महिला राक्षसी प्रवृत्तीच्या असतात. रावणाची बहिण शूर्पणखा ही तशीच होती. लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापून तिला धडा शिकवला होता. त्यामुळे ममताजींनी ही गोष्ट विसरु नये'', अशी धमकी हरियाणा भाजपचे मुख्य माध्यम समन्वयक सूरजपाल अमू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून 'पद्मावती' या चित्रपटाला विविध राजपूत संघटनांसह इतर संघटनांकडून जोरदार विरोध केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात येईल, असे सांगितले होते. या जोरदार विरोधामुळे 1 डिसेंबरला होणारे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. 

त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 'पद्मावती'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीमचे पश्चिम बंगालमध्ये स्वागत केले जाईल. तसेच चित्रपटाच्या प्रीमियर आणि प्रदर्शनासाठी विशेष व्यवस्था पुरवली जाईल, असे सांगितले होते. शिवाय या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद म्हणजे देशातील विचारस्वातंत्र्य नष्ट करण्याची सुनियोजित योजना आहे, असे टि्वट त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. 

दरम्यान, या चित्रपटावरून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचे मुंडके कापणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा यापर्वी अमू यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा ही धमकी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com