विजय मल्ल्या फरार घोषित

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

30 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही विजय मल्ल्या स्वत: किंवा त्याच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले.

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या दिलेल्या कालावधीत न्यायालयात हजर न राहिल्याने त्याला विदेशी विनिमय नियमन कायद्यांतर्गत (फेरा) कारवाई करत न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. 

देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला दिल्ली येथील न्यायालयाने हजर राहण्यास सांगितले होते.

मात्र, 30 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही विजय मल्ल्या स्वत: किंवा त्याच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले, असे मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी सांगितले. 

 

Web Title: marathi news national Delhi court declares Vijay Mallya as proclaimed absconder in FERA case