'आयएमए'च्या आवाहनानंतर डॉक्टरांचा संप अखेर मागे

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या सहभागाचा कोणताही विचार यामध्ये करण्यात आलेला नाही, असा आरोप 'आयएमए'ने केला होता.

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालायतील वैद्यकीय सेवा तत्काळ सुरु कराव्यात, असे आवाहन 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने केले. त्यानंतर लगेचच हा संप मागे घेण्यात आला. 

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या सहभागाचा कोणताही विचार यामध्ये करण्यात आलेला नाही, असा आरोप 'आयएमए'ने केला होता. या विधेयकाला डॉक्टरांनी विरोध करायचे ठरवले. त्यानुसार खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी गेल्या अनेक तासांपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले होते. 

दरम्यान, 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने केलेल्या आवाहन आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

Web Title: marathi news national doctors strike IMA called off doctors strike