जेव्हा चीनचे विमान उतरते दिल्लीऐवजी नागपूर विमानतळावर...

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

'चायना साऊथ एअरलाईन्स'चे विमान नागपुरात उतरवण्यात आले. हे विमान क्वांगचौ ते दिल्लीला जाणार होते. मात्र, दाट धुक्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसला. दिल्लीऐवजी नागपुरात अचानकपणे विमान उतरवण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढत आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे धुकेही मोठे प्रमाणात पसरत आहे. या धुक्यामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम होत असल्याने अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या धुक्यामुळे चीनचे विमान दिल्लीत उतरण्याऐवजी नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. 

'चायना साऊथ एअरलाईन्स'चे विमान नागपुरात उतरवण्यात आले. हे विमान क्वांगचौ ते दिल्लीला जाणार होते. मात्र, दाट धुक्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसला. दिल्लीऐवजी नागपुरात अचानकपणे विमान उतरवण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे सांगितले जात आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमाने उशीराने उड्डाण करण्यात येत असून, काही विमानांच्या मार्गात बदलही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  

Web Title: marathi news national due to fog china airlines flight at nagpur airport