'आधार'ला मिळाला 'हिंदी वर्ड ऑफ द इयर'

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

या शब्दाच्या निवड समितीसमोर योग, विकास, बाहुबली, नोटाबंदी, स्वच्छ आणि आधार असे अनेक पर्यायी शब्द होते. या सर्व शब्दांचा विचार करण्यात आला. वर्षातील हिंदी शब्दाची निवड करणे सोपे नव्हते. मात्र, अखेर 'आधार' च्या शब्दावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध असलेले इंग्रजी शब्दकोश 'ऑक्सफोर्ड डिक्शनरी' दरवर्षी 'इंग्रजी वर्ड ऑफ द इयर' जाहीर करत असते. मात्र, ऑक्सफर्डने यंदा पहिल्यांदाच 'हिंदी वर्ड ऑफ द इयर' जाहीर केला आहे. यामध्ये 'आधार'ला स्थान मिळाले आहे.

मागील वर्षी 2017 या वर्षासाठी 'आधार'ला मान मिळाला आहे. राजस्थानातील जयपूर साहित्य संमेलनात ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली. या साहित्य संमेलनासाठी जगभरातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि पत्रकारांनी उपस्थिती लावली. 

या शब्दाच्या निवड समितीसमोर योग, विकास, बाहुबली, नोटाबंदी, स्वच्छ आणि आधार असे अनेक पर्यायी शब्द होते. या सर्व शब्दांचा विचार करण्यात आला. वर्षातील हिंदी शब्दाची निवड करणे सोपे नव्हते. मात्र, अखेर 'आधार' च्या शब्दावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'आधार' या शब्दाला मागील वर्षभरात वारंवार लोकांना आकर्षित केले आहे. त्यानंतर यावर अखेर विचार होऊन त्याची निवड झाली. 

Web Title: Marathi News national The First Ever Oxford Dictionaries Hindi Word Of The Year Is Aadhaar Vikas