आता 'पेड सेक्स'साठीही 'आधार' बंधनकारक

वृत्तसंस्था
रविवार, 17 डिसेंबर 2017

पणजी : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आधार' बंधनकारक करण्यात येत आहे. मोबाईल क्रमांक, बँक खाते आधारशी जोडण्यासाठी केंद्र सरकारकडून सांगितले जात  आहे. मात्र, गोव्यात चक्क 'पेड सेक्स'साठी पाच तरुणांना दलालाकडून 'आधार'ची मागणी करण्यात आल्याची बाब समोर आली.

दिल्लीतील पाच तरुण बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले होते. ते उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. तेथे त्यांनी दलालाकडे सेक्ससाठी पाच मुलींची मागणी केली. त्यानंतर त्या दलालाने त्या पाच तरुणांना मुलींची सोय झाल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर दलालाने पुन्हा फोन करून आधारची मागणी केली. त्या पाच तरुणांचे नाव, हॉटेल या गोष्टींची माहिती घेतली. मुलींची मागणी करणारे तरुण हे पोलिसांनी पाठवलेले आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्या दलालाने त्या तरुणांना हॉटेलच्या रुमची चावी आणि आधारक्रमांक व्हॉटस् अॅपवर पाठवण्यास सांगितले. या सर्व प्रकारानंतर ते पाचही तरुण चांगलेच घाबरले होते.

दरम्यान, गोव्यात वाढत्या वेश्या व्यवसायाला लगाम लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. पोलिसांच्या भीतीनेच त्या दलालाने आधारची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: marathi news national In Goa no paid sex without Aadhaar card