केंद्राकडून सीबीआयमध्ये 6 नव्या सहसंचालकांची नियुक्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर पाच अशा एकूण सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली.  

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर पाच अशा एकूण सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली.  

प्रवीण सिन्हा हे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेत आहेत. सध्या ते केंद्रीय दक्षता आयोग विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. सिन्हा आणि इतर पोलिस अधिकारी अजय भटनागर आणि पंकज कुमार श्रीवास्तव यांचा सीबीआयने सहसंचालक म्हणून समावेश केला आहे. भटनागर हे केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये पोलिस महानिरीक्षक पदावर तर श्रीवास्तव हे मध्य प्रदेशात केडर अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सीबीआयच्या सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच यामध्ये भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी शरद अगरवाल, गजेंद्र कुमार गोस्वामी आणि व्ही. मुरुगेसन यांचाही तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला. यातील तीन अधिकारी हे सध्या पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

Web Title: Marathi news National Government appoints six new Joint Directors in CBI