मोदींचे पुढचे मिशन ; एक अब्ज बँक खाती 'आधार'शी करणार लिंक

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील मिशन हे 'एक अब्ज 'आधार', एक अब्ज बँक खात्यांना आणि एक अब्ज मोबाईल क्रमांकांना' लिंक करणे हे असणार आहे

नवी दिल्ली : नोटाबंदी, जीएसटी यांसारखे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील मिशन हे 'एक अब्ज 'आधार', एक अब्ज बँक खात्यांना आणि एक अब्ज मोबाईल क्रमांकांना' लिंक करणे हे असणार आहे. मोदी सरकारचे हे एक 'युनिक' ध्येय असेल, अशी माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लागू केलेल्या जीएसटी आणि नोटाबंदी यांसारख्या निर्णयामुळे सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता मोदींनी आपले पुढचे मिशन हे बँक खाती आणि मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने सरकारकडून पावले उचलली जात आहेत. आर्थिक आणि डिजिटल व्यवहारांच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते.

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता ही योजना केल्यास काय सकारात्मक बदल होतात हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: marathi news national Govt next mega mission1 billion UIDs 1 billion accounts 1 billion mobiles