'लव्ह जिहाद'प्रकरण हादिया नवऱ्यासोबत राहू शकते : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

हादिया स्वत:च्या नवऱ्यासोबत राहू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हादिया आणि शफिनला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : केरळातील 'लव्ह जिहाद'प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हादिया स्वत:च्या नवऱ्यासोबत राहू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हादिया आणि शफिनला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे.

लग्न झाल्याचे तरुण आणि तरूणी सांगत असल्याने त्यांचे लग्न वैध असल्याची चौकशी करण्यात कोणताही प्रश्न नाही. ते दोघे पती-पत्नी एकत्र राहण्यास मोकळे आहेत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हादियाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यावेळी हादिया तामिळनाडू येथे शिक्षण घेत होती, तिला वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, त्यावेळी हादियाने तिचा पती शफिनला भेटण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने हादियाला स्वत:च्या नवऱ्यासोबत राहण्यास मोकळी असल्याचे सांगितले. 

Web Title: Marathi news National Hadiyas can live with her husband