गळाभेट कामी आली नाही; राहुल गांधींचा मोदींना टोला

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : जमात-उद-दवाह या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज मोहम्मद सईद याची पाकिस्तानच्या न्यायालयाने सुटका केली. या सुटकेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, ''गळाभेट कामी आली नाही''.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी गळाभेट घेतली होती. या गळाभेटीवर राहुल गांधींनी टीका केली. ''नरेंद्र भाई, गळाभेटीने काहीही साध्य झाले नाही. दहशतवादाचा मास्टरमाईंड मोकाटच आहे. पाकिस्तान लष्कराला फंडिंगप्रकरणी क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट घेण्याची गरज आहे''.

दरम्यान, हाफिज सईदची पाकिस्तान न्यायालयाने कारागृहातून सुटका केल्यानंतर त्याविरोधात अमेरिका कठोर भूमिका घेईल, अशी शक्यता होती. मात्र, अमेरिकेने कोणतेही पाऊल न उचलता फंडिंगप्रकरणी क्लिनचिटच दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com