हरियानात बारावीच्या विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

रितू छाब्रा असे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांच्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडली. त्याने छाब्रा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर रितू छाब्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. 

यमुनानगर : हरियानातील खासगी महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेतील मुख्याध्यापिकेची गोळी झाडून केली. ही घटना यमुनानगर येथे घडली. वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

रितू छाब्रा असे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांच्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडली. त्याने छाब्रा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर रितू छाब्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कमी उपस्थितीच्या कारणावरून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून बडतर्फ करण्यात आले होते. या रागातच संबंधित विद्यार्थ्याने गोळीबार केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर विद्यार्थी बंदूक घेऊन दुपारी शाळेत आला होता. तेव्हा त्याने मुख्याध्यापिकेची भेट घेतली. त्यानंतर तो छाब्रा यांच्या खोलीत गेला आणि त्याने त्यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती यमुनानगर पोलिस अधीक्षक राजेश कलिया यांनी सांगितले. 
 
Web Title: Marathi news National hariyana Class 12 Haryana student guns down principal in Yamunanagar school