12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार केल्यास फाशी 

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

''12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. याशिवाय बलात्कार पीडितांना न्याय मिळावा, यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे''.

- मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाना

चंदीगड : सातत्याने होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून कडक पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता हरियाना सरकारने 12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्याबाबतचे विधेयक लवकरच आणले जाणार आहे, अशी माहिती हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून हरियानामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हरियाना सरकारवर सर्व स्तरावरून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खट्टर सरकारकडून बलात्कार करणाऱ्या नराधमांसाना कठोर शिक्षा व्हावी म्हणून कायदा करण्याचा विचार सुरु आहे. त्यानुसार 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. याशिवाय बलात्कार पीडितांना न्याय मिळावा, यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे, अशी माहिती खट्टर यांनी दिली.

दरम्यान, हरियाना सरकारच्या या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास बलात्कार करणाऱ्या नराधमांना लगाम बसण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Marathi news National haryana government mulls death penalty for rape of girls aged 12 and below