धर्म बदलण्यास कोणीही सांगितले नाही : हादिया

Hadiya
Hadiya

नवी दिल्ली : ''मी एक मुस्लिम आहे, मला माझ्या पतीसोबत राहायचे आहे. धर्म बदलण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही'', असे 'लव्ह जिहाद' प्रकरणातील हादियाने स्पष्ट केले.

मागील वर्षी अखिला या 24 वर्षीय हिंदू धर्मीय तरुणीने शफीन नावाच्या मुस्लिम व्यक्तीसोबत विवाह केला होता.विवाहानंतर तिचे धर्मांतर करण्यात आले होते. धर्मांतरानंतर तिचे हादिया नाव ठेवण्यात आले. केरळमधील 'लव्ह जिहाद'चे हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या.

हादियाचा पती शफीन याचे कुख्यात दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याचा आरोप करत हादियाच्या वडिलांनी विवाहाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांच्या विवाहाला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे शफीनने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करावा, अशी मागणीही शफीनने केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला 27 नोव्हेंबर रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच हादियाने हे स्पष्टीकरण दिल्याने न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com