दिल्ली विमानतळावर सोने, स्टेरॉईडसह एकास अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सोने आणि स्टेरॉईड असा एकूण 69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर तस्करीचा संशय आहे. 

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सोने आणि स्टेरॉईड असा एकूण 69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर तस्करीचा संशय आहे. 

एअर इंडियाच्या विमानाने आल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्याची अधिक चौकशी असता त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी आणि त्याच्या बॅगांची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत 76 ग्रॅमची सोन्याची चैन आणि स्टेरॉईड आढळले. यातील सोने आणि स्टेरॉईडची किंमत 69 लाख 36 हजार रुपये आहे.

याबाबत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की सदर आरोपीच्या संशयित हालचालीवरुन त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून सोने आणि स्टेरॉईड हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून जी औषधे ताब्यात घेतली गेली ती बेकायदेशीररित्या आणण्यात आली आहेत. ही औषधे स्टेरॉईड असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news National Man held for smuggling gold steroids worth Rs 69 lakh at Delhi airport