छत्तीसगडमधील बिजापूर येथील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

''रायपूरपासून सुमारे 500 किमी अंतरावरील पमेड पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात पुजारी कांकेर जंगलामध्ये झालेल्या गोळीबारात एक जवानही जखमी झाला. नक्षलवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत''.

- मोहित गर्ग, पोलिस अधीक्षक, बिजापूर

रायपूर : छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 10 नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी केली गेली.  

Maoists killed

पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली. येथील विशेष महासंचालक डी. ए. अवस्थी (नक्षलविरोधी मोहीम) यांनी या कारवाईला दुजोरा दिला. या कारवाईदरम्यान, 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. 

''रायपूरपासून सुमारे 500 किमी अंतरावरील पमेड पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात पुजारी कांकेर जंगलामध्ये झालेल्या गोळीबारात एक जवानही जखमी झाला. नक्षलवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत'', अशी माहिती बिजापूरचे पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिली.

Maoists killed

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी येथील अनेक भागांमध्ये सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. तसेच दंतेवाडा पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत तीन पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जाते. 

Web Title: Marathi News National News 10 Maoists killed in encounter in Chhattisgarhs Bijapur