कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलनात 11 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

उत्तर काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश असून, या हिमस्खलनात सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) अभियंत्याचा मृत्यू झाला.

श्रीनगर : उत्तर काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन वर्षांच्या बालकाचा समावेश असून, या हिमस्खलनात सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) अभियंत्याचा मृत्यू झाला.

कुपवाडा जिल्ह्यातील या भागात यापूर्वीही हिमस्खलनाची घटना घडली होती. त्या घटनेमध्ये बारा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सात जण हे प्रवासी वाहनात होते. या घटनेत एका बीआरओचे अधिकारी एम. पी. सिंह हे कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या दोन्ही घटना साधना येथील उच्चभ्रू वस्तीत घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.  

या हिमस्खलनात अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेली शोधमोहीम शनिवारी थांबवण्यात आली असून, सध्या 10 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मृतांमध्ये दोन वर्षांच्या लहान बालकाचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी वसीम अहमद यांनी दिली. 
 

Web Title: marathi news national news 11 killed in avalanche in north Kashmirs Kupwara district