1 जानेवारीला मुलगी जन्मल्यास मिळणार 5 लाख !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कर्नाटकातील बंगळुरू महापालिकेच्या वतीने ही नवी योजना आणण्यात आली. नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे 1 जानेवारीला मुलगी जन्मास आल्यास 5 लाख रुपये दिले जाण्याचा विचार आहे. हे 5 लाख रुपये मुलीच्या भविष्यासाठी देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती बंगळुरु महापालिकेचे महापौर आर. संपत राज यांनी दिली.

बंगळुरु : सध्या अजूनही काही ठिकाणी वंशाचा दिवा हवा यासाठी मुलाचा आग्रह धरला जातो. पण स्त्रीजातीचे अर्भक असल्यास अनेकदा त्या अर्भकाची भ्रूणहत्या केली जाते. असा प्रकार सर्रास घडत असल्याचे समोर आले. मात्र, आता 1 जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास संबंधित बालिकेच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहे. हे पाच लाख रुपये मुलीच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहे. 

कर्नाटकातील बंगळुरू महापालिकेच्या वतीने ही नवी योजना आणण्यात आली. नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे 1 जानेवारीला मुलगी जन्मास आल्यास 5 लाख रुपये दिले जाण्याचा विचार आहे. हे 5 लाख रुपये मुलीच्या भविष्यासाठी देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती बंगळुरु महापालिकेचे महापौर आर. संपत राज यांनी दिली. तसेच महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे 5 लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, बंगळुरू महापालिकेच्या या अनोख्या अशा योजनेमुळे  सगळीकडे याची चर्चा सुरु झाली असून, हे 5 लाख रुपये किती बालिकांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news national news 1st january newborn baby girl will get five lakh