मोसूलमधील अपहृत 39 भारतीयांची हत्या : सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

''इस्लामिक स्टेटमधील इराकच्या मोसूल प्रांतातून 2014 साली अपहरण झालेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग मृत पावलेल्या भारतीयांचे शव इराकहून भारतात आणण्यासाठी जाणार आहेत''.

- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटमधील इराकच्या मोसूल प्रांतातून 2014 साली अपहरण झालेल्या 39 भारतीयांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. तसेच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग मृत पावलेल्या भारतीयांचे शव इराकहून भारतात आणण्यासाठी जाणार आहेत, असेही स्वराज यांनी सांगितले.

39 Indian men who went missing in Iraq in 2014

राज्यसभेत एका निवेदनाद्वारे स्वराज ही माहिती दिली. हत्या करण्यात आलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह कब्रेतून खोदून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे काही अवयव डीएनए तपासणीसाठी बगदाद येथे पाठविण्यात आले आहेत, असेही स्वराज म्हणाल्या. ''काल आम्हाला याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर यातील 38 जणांचे डीएनए नमुने आणि 39 जणांचे डीएनएचे नुमने 70 टक्के जुळण आले'', असे स्वराज यांनी सांगितले. यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग मृत पावलेल्या भारतीयांचे शव इराकहून आणण्यासाठी जातील. त्यांचे विमान अमृतसर येथे जाईल. त्यानंतर पटणा आणि कोलकाता येथे विमान जाईल. 

दरम्यान, अपहरणकर्त्यांपासून वाचलेल्या हरजित मसीह या भारतीयाने दावा केला, की ''आमच्या ग्रुपमधील इतर लोकांना 15 जून 2014 रोजी ठार करण्यात आले होते. या 40 लोकांच्या ग्रुपमधील बहुतांश लोक हे बांधकाम कामगार आहेत'', असे त्याने सांगितले. स्वराज यांच्या स्पष्टीकरणानंतर अपहरण झालेल्या संबंधितांच्या कुटुंबीयांची मोठी निराशा झाली.
 

Web Title: Marathi News National news 39 Indians abducted by Islamic State in Iraq are dead Mosul