'आधार' डाटा पूर्णपणे सुरक्षित : सरकारचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

आधारकार्डवरील कोणतीही माहिती कोणालाही दिली जात नाही. आधारकार्डवरील माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे. देशातील बहुतांश नागरिकांचा 'आधार'च्या योजनेवर विश्वास आहे.

- रविशंकर प्रसाद, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : आधारकार्डवरील कोणतीही माहिती कोणालाही दिली जात नाही. आधारकार्डवरील माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे. देशातील बहुतांश नागरिकांचा 'आधार'च्या योजनेवर विश्वास आहे, अशी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (बुधवार) दिली. 

 

aadhar card

लोकसभेत रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ''सध्या देशातील 120 कोटी जनतेकडे आधारकार्ड असून, त्यापैकी 57 कोटी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे 57,000 कोटी रुपयांची बचत झाली. 'यूआयडीए'ची मांडणी योग्यप्रकारे करण्यात आली आहे. आधारकार्डच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. 'यूआयडीए' कायदेशीरदृष्ट्या मजबूत आहे. आधारवरील माहितीच्या सुरक्षेसाठी कायदेशीर, संघटनात्मक आणि तांत्रिक उपाय करण्यात आले आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'आधार'ची माहिती काही रूपयांसाठी लिक केली जात असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.  

Web Title: Marathi news National News Aadhar Data Government Ravishankar Prasad