'आधार' लिंकिंगच्या मुदतीत अनिश्चित काळासाठी वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

शासनाच्या विविध सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी 31 मार्च ही मुदत निश्चित करण्यात आली. मात्र, आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून, ही मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्यात येत असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

नवी दिल्ली : शासनाच्या विविध सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी 31 मार्च ही मुदत निश्चित करण्यात आली. मात्र, आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून, ही मुदत अनिश्चित काळासाठी वाढविण्यात येत असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

AADHAR

आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुढील सुनावणी होईपर्यंत वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. आर्थिक तसेच इतर कोणत्याही व्यवहारांसाठी आधारकार्ड लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. 

Image result for AADHAR link

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आधारकार्डसंदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेतली. सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सरकार आधारकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांवर दबाव आणू शकत नाही, असेही म्हटले आहे. 

Web Title: Marathi News National News Aadhar Linking Date Extended Supreme Court