वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे टळला विमान अपघात

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

एअर इंडिया आणि विस्तारा विमानाचा अपघात थोडक्यात टळला. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमानादरम्यान वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अपघात टळला.

नवी दिल्ली : एअर इंडिया आणि विस्तारा विमानाचा अपघात थोडक्यात टळला. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमानादरम्यान वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. विस्तारा आणि एअर इंडियाचे विमान 100 फुट उंचीवर गेले असता ही घटना घडली.

Air india

ही घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. 
ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे जाणकारांनी सांगितले. एअर इंडियाचे एअर बस ए-319 हे विमान मुंबईहून भोपालला जात होते. तर त्याच्या विरुद्ध दिशेने विस्तारा विमान ए-320 दिल्लीहून पुण्यात येत होते. या विमानांमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यादरम्यान हा प्रकार झाला. ही दोन्ही विमाने अत्यंत वेगात होती. विमाने जवळपास 100 फुट उंचीवर गेली होते. त्यादरम्यान ही घटना घडली. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी दुर्घटना टळली.  
 

Web Title: Marathi News National News Air Accident Air India and Vistara Plane