'अल् ट्रॅव्हल' अॅपच्या माध्यमातून जुळ्या भावांची लाखोंची कमाई

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

स्वप्निल शिंदे आणि स्नेहल शिंदे असे या दोघा भावांची नावे आहेत. स्वप्निल आणि स्नेहल हे दोघे 'अल् ट्रॅव्हल' अॅपचे सहसंस्थापक आहेत. स्वप्निल हा अभिनेता सलमान खान याचा चाहता आहे तर स्नेहल हा अभिनेता शाहरूख खान याचा भक्त आहे. या दोन्ही जुळ्या भावंडांमध्ये बरेचसे साम्य आहे. या दोघांनीही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. 

बंगळूरू : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली व्यक्ती अनेकदा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवं-नवे सॉफ्टवेअर विकसित करत असतात. त्यातून चांगली कमाईही करत असतात. अशीच कमाई सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या दोघा जुळ्या भावांनी 'अल् ट्रॅव्हल' अॅप लाँच करून केली.

स्वप्निल शिंदे आणि स्नेहल शिंदे असे या दोघा भावांची नावे आहेत. स्वप्निल आणि स्नेहल हे दोघे 'अल् ट्रॅव्हल' अॅपचे सहसंस्थापक आहेत. स्वप्निल हा अभिनेता सलमान खान याचा चाहता आहे तर स्नेहल हा अभिनेता शाहरूख खान याचा भक्त आहे. या दोन्ही जुळ्या भावंडांमध्ये बरेचसे साम्य आहे. या दोघांनीही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. 

स्नेहल शिंदे याने सांगितले, की यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला कधीही सहसंस्थापकाची गरज भासली नाही. आम्ही 'अल् ट्रॅव्हल' हे अॅप लाँच केले असून, हे अॅप अमेरिकन एक्सप्रेसने विकत घेतले आहे. या अॅपच्या माध्यमातून अंदाजे 12 ते 15 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. 

स्नेहल हा 'याहू' कंपनीत नोकरीस असून, त्याने 2006 साली याहू जॉईन केले. स्नेहल आणि त्याच्या टीमने याहू फायनान्स, स्पोर्ट विभागात काम केले. 

Web Title: Marathi News National News AL Travel App twins earns huge amount