आंध्रला केंद्राकडून अखेर 1,269 कोटींचा निधी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

या आश्वासनानंतर आज अखेर केंद्र सरकारकडून 1269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, हा निधी दिल्यानंतरही भाजप आणि टीडीपीमध्ये तणाव कायम आहे. 

अमरावती : आंध्र प्रदेशच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून 1,269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) या निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी देण्यात आला आहे.  

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्रच्या विकासासाठी आणि बहुचर्चित पोलावरम प्रकल्पासाठी कोणताही भरघोस निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या सत्ताधारी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आंध्रच्या विकासासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांना सरकारकडून देण्यात आले होते. या आश्वासनानंतर आज अखेर केंद्र सरकारकडून 1269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मात्र, हा निधी दिल्यानंतरही भाजप आणि टीडीपीमध्ये तणाव कायम आहे. 

modi and chandrababu naidu

यापूर्वी राज्य सरकारकडून पोलावरम प्रकल्पासाठी 417.44 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. त्यानंतर आता 1269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 

दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांपासून चंद्राबाबू नायडू वारंवार दिल्लीवारी करत आहेत. आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर आंध्रला विशेष राज्याचा दर्जा, अमरावती या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्रीय मदत व त्याअनुषंगाने मिळणारा आर्थिक लाभ द्यावा, यासाठी त्यांनी किमान 40 वेळा मोदी- शहा, जेटली यांच्या भेटी घेतल्या होत्या.

Web Title: Marathi News National News Andhra Pradesh Government allowed 1269 crores