आंध्रची स्वतंत्र रेल्वे मार्गाची मागणी केंद्राने फेटाळली

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

तेलुगू देसम पक्षाचे केंद्रात मंत्रिपदावर असलेल्या अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी त्यांच्या मंत्रिपदांचे राजीनामे दिले. त्यानंतर केंद्राने आंध्रप्रदेशकडून केली जात असलेली स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे केंद्रात मंत्रिपदावर असलेल्या अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी त्यांच्या मंत्रिपदांचे राजीनामे दिले. त्यानंतर केंद्राने आंध्रप्रदेशकडून केली जात असलेली स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Image result for Rail

आंध्रप्रदेशला विशेष दर्जा द्यावा, या मागणीसाठी तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे मागणी लावून धरली होती. मात्र, सरकारने त्यांची ही मागणी फेटाळली होती. त्यामुळे नाराज झालेल्या नायडू यांनी केंद्रात मंत्री असलेल्या राजू आणि चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर केंद्र सरकारने आता आंध्रची स्वतंत्र रेल्वे मार्गाची मागणी फेटाळली आहे.   

Rail

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्य सचिव दिनेश कुमार यांच्यासोबत चर्चा केली असून, या चर्चेनंतर ही माहिती समोर आली आहे.  

Web Title: Marathi News National News Andhra Pradesh Rail Track Chandrababu Naidu