संघात नसलेले हिंदू नाहीत ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

'भारतात राहणाऱ्या सर्वांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे. जर ते असे बोलले नाहीतर ते देश सोडून बाहेर जाऊ शकतात. देशातील हिंदूंना समाजासाठी काही करायची इच्छा असल्यास त्यांनी 'लव्ह जिहाद' आणि पैसे देऊन करण्यात येत असलेल्या धर्मांतराबाबत जागृती करणे गरजेचे आहे.''

- भाजप आमदार टी. राजा सिंग

नवी दिल्ली : ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक फॅक्टरी आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आदर्श व्यक्ती निर्माण करते. त्यामुळे अशा फॅक्टरीमध्ये तुम्ही असाल तरच तुम्ही हिंदू'', असे वादग्रस्त विधान हैदराबाद येथील भाजप आमदार टी. राजा सिंग यांनी केले. 

BJP MLA t raja singh

मध्यप्रदेशातील निमूच जिल्ह्यातील एका जाहीर सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''जी व्यक्ती आरएसएसने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहत नाहीत. ती व्यक्ती अद्यापही हिंदू नाही. त्यांचा काहीही संबंध नाही. सिंग पुढे म्हणाले, ''आरएसएस एक फॅक्टरी आहे, जी आदर्श व्यक्ती निर्माण करत असते. आरएसएसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे व्यक्ती तयार केले आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करितो, की तुम्ही सर्वांनी आरएसएसच्या जवळच्या शाखेत जाऊन नोंदणी करावी. जर कोणतीही हिंदू व्यक्ती आरएसएसमध्ये सामील होणार नसेल तर ती व्यक्ती खरी हिंदू नाही. म्हणून ते आपल्या देशाची सेवा करण्यास असमर्थ असतात''.  

RSS

तसेच ते पुढे म्हणाले, ''भारतात राहणाऱ्या सर्वांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे. जर ते असे बोलले नाहीतर ते देश सोडून बाहेर जाऊ शकतात. देशातील हिंदूंना समाजासाठी काही करायची इच्छा असल्यास त्यांनी 'लव्ह जिहाद' आणि पैसे देऊन करण्यात येत असलेल्या धर्मांतराबाबत जागृती करणे गरजेचे आहे'', असेही ते म्हणाले. 

Web Title: Marathi News National News BJP MLA T Raja Singh RSS