मुस्लिमांनी भारतात राहू नये : भाजप खासदार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

''मुस्लिमांनी त्यांच्या लोकसंख्येच्या जोरावर देशाचे विभाजन केले. त्यामुळे त्यांनी इथे का रहावे. त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात जाऊन रहावे''.

-विनय कटियार, भाजप खासदार

नवी दिल्ली : ''मुस्लिमांनी त्यांच्या लोकसंख्येच्या जोरावर देशाचे विभाजन केले. त्यामुळे त्यांनी इथे का रहावे. त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात जाऊन रहावे. ते सध्या इथे काय करतात, असे विधान भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केले.

vinay katiyar

खासदार कटियार यांनी विश्व हिंदू परिषदेच्या युवक विभागाची स्थापना केली. मुस्लिमांबाबत त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''मुस्लिमांनी त्यांच्या लोकसंख्येच्या जोरावर देशाचे विभाजन केले. त्यामुळे त्यांनी इथे का राहावे. त्यांना स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांग्लादेशात जाऊन राहावे, ते सध्या इथे काय करतात.  

Muslim

तसेच बजरंग दलाने सांगितले, की संसदेत विधेयक मांडले जायला हवे, जे कोणी वंदे मातरम् आणि जो कोणी राष्ट्रध्वजाचा अपमान करेल किंवा पाकिस्तानी झेंडा फडकावेल, अशा लोकांसाठी कायदा करायला हवा.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हा एक कारखाना आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आदर्श व्यक्ती निर्माण करते. त्यामुळे अशा कारखान्यामध्ये तुम्ही असाल तरच तुम्ही हिंदू'', असे वादग्रस्त विधान हैदराबाद येथील भाजप आमदार टी. राजा सिंग यांनी काल (मंगळवारी) केले होते. 

Web Title: Marathi News National News BJP MP Vinay Katiyar Muslim should go Pakistan