'बोफोर्स'प्रकरणी सीबीआयचे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

उच्च न्यायालयाने बोफोर्स कंपनी आणि हिंदुजा बंधूंच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे त्या दृष्टीने सीबीआयकडून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आव्हान देणारे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.   

नवी दिल्ली : देशातील गैरव्यवहारांपैकी एक असलेला बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी देशाचे अॅटर्नी जनरल यांनी केलेल्या सुचनेविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपींविरोधातील सर्व पुरावे रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Bofors Scam

बोफोर्स घोटाळा जवळपास 64 कोटी रूपयांचा आहे. हा घोटाळा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजला जात आहे. तत्कालीन 31 मे 2005 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सीबीआयने याचिका दाखल केली. याप्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने बोफोर्स कंपनी आणि हिंदुजा बंधूंच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे त्या दृष्टीने सीबीआयकडून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आव्हान देणारे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.   

CBI

दरम्यान, बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याने बोफोर्स प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Marathi News National News Boforce Scam CBI High Court Challenge