देशात फक्त 'मोदी व्होट बँक' : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

योगी आदित्यनाथ हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व करत होते. मात्र, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपसह, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्षाकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी सप आणि बसपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष एकत्र आले असून, त्यांच्या आघाडीचा भाजपावर कोणताच परिणाम होणार नाही. देशात फक्त एकच व्होट बँक आहे आणि ती म्हणजे 'मोदी व्होट बँक''.

Voting india

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. गोरखपूरमधून आदित्यनाथ यांनी तर फुलपूरमधून केशवप्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्याने या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व करत होते. मात्र, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

दरम्यान, एकेकाळी कट्टर विरोधक असलेले बसप आणि सप या दोन्ही पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी यापुढे देशात जातीच्या आधारित मतांचे राजकारण चालणार नाही. आता देशात जर कोणती व्होट बँक असेल तर ती 'मोदी व्होट बँक' असेल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Marathi News National News UP Bypolls CM Yogi Adityanath PM Narendra Modi Vote Bank