मोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात गंभीर जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जसोदा बेन या त्यांच्या कारने बरान जिल्ह्यातील कोटा येथून गुजरातला परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात जसोदा बेन यांच्या डोक्याला मार लागला. तर कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना चितौडगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदा बेन यांच्या कारला आज (बुधवार) सकाळी अपघात झाला. हा अपघात चितौडगड येथील रस्त्यावर झाला. या अपघातात जसोद बेन गंभीर जखमी झाल्या असून, कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले. 

जसोदा बेन या त्यांच्या कारने बरान जिल्ह्यातील कोटा येथून गुजरातला परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात जसोदा बेन यांच्या डोक्याला मार लागला. तर कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना चितौडगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जखमींमध्ये जसोदा बेन, त्यांचे वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात वसंतभाई मोदी हे जखमी झाले आहेत. 

''जसोदा बेन यांना या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्या त्यांच्या इनोव्हा कारने त्यांच्या नातेवाईकांसोबत जात होत्या. त्यादरम्यान कटुंदा येथे हा अपघात झाला'', असे परसोली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शाम सिंह यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News National News Car Accident Jasoda Ben PM Modi Wife