कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

नवी दिल्ली : बहुचर्चित कावेरी पाणीवाटप प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात केली आहे.

cauvery river dispute

तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या दोन्ही राज्यांमधील वाद सोडवण्यासाठी न्यायालयाने सांगितले, की कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही. यावेळी न्यायालयाने तामिळनाडूला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली. मात्र, दुसरीकडे कर्नाटक राज्याचा पाण्याचा वाटा वाढवण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकार करणार असल्याचेही न्यायालायने सांगितले. 

Web Title: Marathi News National News cauvery river dispute Supreme Court