'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल 

पीटीआय
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

अमेरिकास्थित सीडीएम स्मिथ या कंपनीने भारतातील उपकंपनीच्या सहाय्याने 2011-2016 या कालावधीत विविध प्रकल्पांची कंत्राट मिळविण्यासाठी 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांना सुमारे 1.18 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीचे तत्कालीन संचालक गोपाळ कुमार, एस. कृष्णमृर्ती यांच्यासह 'एनएचएआय'च्या काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी आज सीबीआयने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तसेच, सीडीएम स्मिथ इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तत्पूर्वी सीबीआयने संबंधित कंपनीच्या बेंगळूर, चेन्नई व इतर ठिकाणी असलेल्या कार्यालयांची आज सकाळी झाडाझडती घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

अमेरिकास्थित सीडीएम स्मिथ या कंपनीने भारतातील उपकंपनीच्या सहाय्याने 2011-2016 या कालावधीत विविध प्रकल्पांची कंत्राट मिळविण्यासाठी 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांना सुमारे 1.18 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीचे तत्कालीन संचालक गोपाळ कुमार, एस. कृष्णमृर्ती यांच्यासह 'एनएचएआय'च्या काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

सदर कंपनीला यामुळे 4 दशलक्ष डॉलरचा फायदा झाला होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाच्या तपास करण्याची मागणी भारताकडे केली होती. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देत एनएचआयचा कोणताही अधिकारी यात दोषी आढळला तर, त्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मागे दिले होते. 

Web Title: Marathi News National News CBI File FIR NHAI officer