श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर दोन दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. एके 47 शस्त्रांस्त्रांसह दहशतवाद्यांनी करण सेक्टरमधील तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न सीआरपीएफच्या जवानांनी हाणून पाडला. 

श्रीनगर : श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर दोन दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. एके 47 शस्त्रांस्त्रांसह दहशतवाद्यांनी करण सेक्टरमधील तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न सीआरपीएफच्या जवानांनी हाणून पाडला. सध्या या परिसरात सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

Ceasefire

सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतीला चारही बाजूंनी घेरले आहे. सध्या या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यात दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील कुख्यात दहशतावादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मूच्या सुंजवा आर्मी तळावर हल्ला केला होता. या दहशवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा झाले होते. तर येथील एका स्थानिकाचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादरम्यान केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

Web Title: Marathi News National News Ceasefire Violence Terrorist Shrinagar Attack