छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात 9 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान हुतात्मा झाले असून, 2 जवान जखमी झाले आहेत.

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान हुतात्मा झाले असून, 2 जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आयईडीच्या माध्यमातून स्फोट घडवला असल्याची माहिती मिळत आहे.  

Maoist attack

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला. या स्फोटात 9 जवान जागीच हुतात्मा झाले. तर अन्य दोन जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Image result for Maoist attack

दरम्यान, २ मार्च रोजी तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर मोठी कारवाई करत १० माओवाद्यांना ठार केले होते. या कारवाईत एक जवान हुतात्मा झाला होता. त्यानंतर आज छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला. 

Web Title: Marathi News National News Chhattisgarh Maoist attack 9 Jawan Martyr