...पण भारतही दुबळा नाही : लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार आहे. मात्र, त्यांना आवश्यक शस्त्रांचा पुरवठा करायला हवा. आम्हाला अत्याधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. ती पूर्ण केली पाहिजे.

- जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख

नवी दिल्ली : ''उत्तरेकडील सीमेवर लक्ष देण्याची वेळ आता भारतावर आली आहे. चीनच्या गतीशीलतेवर लक्ष ठेवण्यास भारत मजबूत आहे. चीन हा शक्तिशाली देश आहे. पण भारतही दुबळा नाही'', असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले.  

सीमेवर चीनी सैन्याकडून धोका पोचू शकतो. त्यामुळे भविष्यात चीनकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत समर्थ आहे. मागील वर्षी 2017 मध्ये आमच्या लष्करी कारवाईचे लक्ष दक्षिण काश्मीर होते. यावर्षी आता यामध्ये बदल केला जाणार आहे. यावर्षी 2018 मध्ये आता उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, पट्टण, हंडवरा, कुपवारा, सोपूर, लोलाब आणि उत्तरेकडील काही भागात लक्ष दिले जाणार आहे. 

दरम्यान, भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला अत्याधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. भविष्यातील लढायांसाठी शस्त्रांची गरज पुरवली पाहिजे, असेही लष्करप्रमुख म्हणाले.

Web Title: marathi news national news China is a powerful country but we are not a weak nation says Army Chief Rawat