दुसरीत शिकणाऱ्या बालिकेचे लैंगिक शोषण ; शिक्षकास अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पीडित बालिका येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीत शिक्षण घेत आहे. शाळेतीलच एका शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण केले. याबाबतची माहिती पीडित बालिकेने तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली.

कोलकाता : एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेच्या शिक्षकास अटक करण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पीडित बालिकेच्या पालकांनी निषेध करत शाळेवर मोर्चा काढला.

rape

पीडित बालिका येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीत शिक्षण घेत आहे. शाळेतीलच एका शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण केले. याबाबतची माहिती पीडित बालिकेने तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली. आरोपीस अटक केल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि त्या शिक्षकाला निलंबित करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. 

याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की ''पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली".

Web Title: Marathi News National News Crime Class 2 girl Teacher arrested