दिल्लीत शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

नववीत शिकणारा 16 वर्षीय तुषार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तुषार हा शाळेच्या स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत आढळला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतील स्वच्छतागृहात आढळला. ही हत्या शाळेतच शिकणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.  

हरियानातील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील नववीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला होता. त्यानंतर देशभरात शाळेच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर आता असाच प्रकार दिल्लीतील करवलनगर येथील शाळेत घडला. 

student Dead

नववीत शिकणारा 16 वर्षीय तुषार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तुषार हा शाळेच्या स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत आढळला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

दरम्यान, तुषारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली. तुषारची अन्य काही विद्यार्थ्यांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर मारहाण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. 

Web Title: Marathi News National News Crime Delhi A boy Found dead in school toilet