मानवी तस्करीप्रकरणी दलेर मेहंदींना दोन वर्षांचा तुरुंगवास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

शमशेर सिंह आणि दलेर मेहंदी या दोघांविरोधात म्युझिक टीमच्या माध्यमातून लोकांना परदेशात पाठवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत असल्याचे आरोप त्यांच्यावर होता. या आरोपातूनच आज ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना न्यायालयाने दणका दिला आहे. मेहंदी यांना 15 वर्षांपूर्वीच्या मानवी तस्करी खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांच्यासह त्यांचे बंधू शमशेर सिंह यांनाही न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय या दोघांनाही पतियाला न्यायालयाने दंडही ठोठावला आहे.

Patiala court

पतियाला न्यायालयात याप्रकरणी आज (शुक्रवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेहंदी यांना दोषी ठरवले. काही वेळानंतर त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2003 मध्ये झालेल्या मानवी तस्करीप्रकरणाची सुनावणी आज 15 वर्षांनंतर घेण्यात आली. दलेर मेहंदी आणि त्यांचे बंधू शमशेर सिंह या दोघांविरोधात 31 खटले दाखल करण्यात आले होते. यातील पहिला खटला हा 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. यातील जास्तीत जास्त लोकांना अमेरिकेत पाठविण्यात आल्याने त्यांच्याविरोधात बेकायदेशीरपणे लोकांना परदेशात पाठविल्याचा आरोप होता. 

दरम्यान, शमशेर सिंह आणि दलेर मेहंदी या दोघांविरोधात म्युझिक टीमच्या माध्यमातून लोकांना परदेशात पाठवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत असल्याचे आरोप त्यांच्यावर होता. या आरोपातूनच आज ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Marathi News National News Crime News Daler Mehandi Sentenced 2 Years jail for human trafficking