बंगळुरूत सहा वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

''या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने श्रीनिवास यास तत्काळ निलंबित केले. याप्रकारामुळे आम्हाला धक्का बसला आहे. श्रीनिवास हा मागील सात वर्षांपासून शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता''.

- अधिकारी, शाळा प्रशासन

बंगळुरु : येथील एका खासगी शाळेतील कर्मचाऱ्याने शाळेतीलच एका सहा वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी शाळेतील कर्मचाऱ्याला अटक केली. 

Child molested

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहकर्मचारी असलेल्या 42 वर्षीय श्रीनिवास याने येथील शाळेतील एका बालकावर लैंगिक अत्याचार केला. तसेच जेव्हा घडलेला हा प्रकार त्या बालकाने त्याच्या वडिलांना सांगितला, त्यानंतर वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली. हा बालक घरी परतत असताना श्रीनिवास याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, श्रीनिवास याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी देखील असा प्रकार कधी घडला का, याबाबत आम्ही तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. 

''या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने श्रीनिवास यास तत्काळ निलंबित केले. याप्रकारामुळे आम्हाला धक्का बसला आहे. श्रीनिवास हा मागील सात वर्षांपासून शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत होता'', असे शाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

Web Title: Marathi News National News Crime News employee held for allegedly molesting student