हैदराबादेत 'पद्मावत' पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार ; आरोपीस अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघे 'पद्मावत' चित्रपट पाहण्यासाठी येथील प्रशांत सिनेमागृहात गेले होते. त्यावेळी आरोपीने पीडित तरुणीवर सिनेमागृहात बलात्कार केला. पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांची दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्या ओळखीनंतर या दोघांची मैत्री झाली, अशी माहिती विभागीय निरीक्षक मथाय यांनी दिली. 

हैदराबाद : हैदराबाद येथील एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित तरुणी 'पद्मावत' चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेली असता ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघे 'पद्मावत' चित्रपट पाहण्यासाठी येथील प्रशांत सिनेमागृहात गेले होते. त्यावेळी आरोपीने पीडित तरुणीवर सिनेमागृहात बलात्कार केला. पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांची दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्या ओळखीनंतर या दोघांची मैत्री झाली, अशी माहिती विभागीय निरीक्षक मथाय यांनी दिली. 

Image result for rape

सिनेमागृहात गर्दी कमी असल्याने आणि हा प्रकार घडला त्यावेळीही आसपास कोणीही नसल्याचा फायदा आरोपीने घेत पीडितेवर बलात्कार केला. यातील आरोपीला पोलिसांनी 31 जानेवारी रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.   

पीडित तरुणीच्या गुप्तांगास जखमा झाल्या असून, तिला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, भारतीय दंडविधान कलम 376 अंतर्गत संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

Web Title: Marathi News National News Crime News Girl raped in Theatre