हरियानात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

या अल्पवयीन बालिकेचा मृतदेह कोणत्याही वस्त्राविना बुधखेरा गावातील जिंद साफिडॉन येथे शुक्रवारी रात्री आढळला. बालिकेच्या गुप्तांगावर जखमा करण्यात आल्या होत्या आणि बलात्कारानंतर तिचे पोट फाडण्यात आले. 

रोहतक : राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या निर्भया बलात्कारप्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार हरियानातील जिंद येथे घडला. एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर जखमा करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

पीडित बालिका कुरुक्षेत्र येथील झांसा गावात राहत होती. 9 जानेवारीपासून ती बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या अल्पवयीन बालिकेचा मृतदेह कोणत्याही वस्त्राविना बुधखेरा गावातील जिंद साफिडॉन येथे शुक्रवारी रात्री आढळला. बालिकेच्या गुप्तांगावर जखमा करण्यात आल्या होत्या आणि बलात्कारानंतर तिचे पोट फाडण्यात आले. 

याबाबत पोलिसांनी सांगितले, की मृतदेहाची ओळख पटली असून, त्या बालिकेचा मृतदेह वस्त्राविना आढळला. तसेच तिच्या गुप्तांगावरही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचे निर्देशनास आले. तिचा मृतदेह रोहतक येथील 'पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (पीजीआयएमएस) येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

याबाबत पीजीआयएमएसचे शवविच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. धत्तारवाल यांनी सांगितले, की ''पीडित बालिकेच्या चेहऱ्यावर आणि तोंडामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची पूर्ण माहिती मिळू शकेल.

Web Title: marathi news national news crime news Haryana horror Girl body found with mutilated private parts ruptured liver